ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
कालाहारी
कालाहारी : दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध वाळवंट. २०० द. ते २८० द. आणि १९० पू. ते २४० पू. क्षेत्रफळ २, ५९, ००० चौ. किमी. बोट्स्वाना, नैऋत्य आफ्रिका आणि दक्षिण आफ्रिका संघराज्य या देशांमध्ये हे वाळवंट पसरले असून, त्याची समुद्रसपाटीपासून सरासरी उंची ९०० मी. आहे.
कासाई
कासाई : मध्य आफ्रिकेतील कॉंगो (झाईरे) नदीची महत्वाची उपनदीत्र. लांबी सु.२,१५० किमी. जलवाहनक्षेत्र ९,०६,५०० चौ. किमी. अंगोलामधील बेंग्वेला पठाराच्या १,१०० मी. उंचीच्या डोंगराळ प्रदेशात कासाईचा उगम होतो. तेथून ती सु.४०० किमी. पूर्वेकडे वाहते व मग उत्तरवाहिनी होते.
ऊतकतापन चिकित्सा
ऊतकतापन चिकित्सा : (डायाथर्मी). उच्च कंप्रतेच्या (दर सेकंदाला होणार्या कंपन संख्येच्या) विद्युत् प्रवाहाने शरीरातील ऊतकांमध्ये (समान रचना व कार्य असलेल्या पेशीसमूहांमध्ये) उष्णता उत्पन्न करण्याच्या क्रियेचा उपयोग ज्या चिकित्सेत करण्यात येतो तिला ऊतकतापन चिकित्सा म्हणतात.
वीजप्रवाह - पावसाळ्यात घ्यावयाची काळजी
वीज यंत्रणेवर झाडे कोसळणे, मोठ्या फांद्या तुटून पडणे, अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्कीटमुळे तसेच पाणी हे विजेचे चांगले वाहक असल्याने विविध दुर्घटना घडतात.
एल् निनो ( El nino )
पर्यावरणीय बदलाच्या प्रक्रियेतील एक महत्त्वपूर्ण सागरी प्रवाह. स्पॅनिश भाषेत एल् निनो याचा अर्थ मूल. ख्रिसमसच्या सुमारास दक्षिण अमेरिकेतील पेरू आणि एक्वादोर किनार्यालगत पॅसिफिक महासागरी उष्ण प्रवाह वाहत असल्याने स्थानिक मत्स्य व्यावसायिकांनी त्यास बाल येशू असे नाव दिले.
गल्फ प्रवाह
गल्फ प्रवाह : उत्तर अटलांटिक महासागरातील जगप्रसिद्ध उबदार सागरी प्रवाह. १४९२ मध्ये कोलंबसच्या व १५१३ मध्ये पॉन्से द लेऑन या स्पॅनिश नाविकाच्या लक्षात तो आला होता. तो मेक्सिकोच्या आखातातून येतो, या समजुतीमुळे बेंजामिन फ्रँक्लिनने त्याला गल्फ स्ट्रीम हे नाव दिले.
दुग्धस्रवण व स्तनपान
सस्तन प्राण्यांना स्तनातून स्रवणाऱ्या दुधप्रवाहाला दुग्धस्रवण म्हणतात. स्तनांचे शरीरक्रियात्मक विशिष्ट कार्य दुग्धस्रवण हे असून ते फक्त जरूरीच्या वेळीच सुरू होते आणि गरज संपली म्हणजे बंद होते.
नदी संकल्पना
मोठ्या भूप्रदेशावरून वाहत जाणारा निसर्गोत्पन्न जलप्रवाह.
पद्मा नदी
पद्मा नदी : बांगला देशातून वाहणाऱ्या गंगा आणि ब्रह्मपुत्रा (जमुना) यांचा, मेघना नदीला मिळेपर्यंतचा आग्नेयवाही संयुक्त प्रवाह. लांबी सु. १२० किमी. प. बंगाल राज्याच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जंगीपूरच्या ईशान्येस सु. आठ किमी. वर, गंगा नदी भागीरथीहुगळी व पद्मा-मेघना अशी द्विशाखी होते.
सुरमा नदी
सुरमा नदी : भारत व बांगला देशातून वाहणारी व मेघना नदीचा शीर्षप्रवाह असलेली एक नदी. लांबी सु. ९०२ किमी. मणिपूर टेकड्यांमध्ये माओसोंगसंगच्या दक्षिणेस २५० २८' उत्तर अक्षांश व ९४० १८' पूर्व रेखांश यांदरम्यान या नदीचा उगम आहे.
भोगावती
भोगावती : ही नदी म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर जिल्ह्यातील ⇨पंचगंगा नदीचा एक शीर्षप्रवाह होय. लांबी सु. ८२ किमी. सर्वसामान्यपणे दक्षिणोत्तर वाहणारी ही नदी सह्याद्रीच्या रांगेत, कोल्हापूर शहराच्या नैर्ऋत्येस सु. ४८ किमी.वर फोंडाघाटाच्या (फोंडा खिंडीच्या) दक्षिणेस उगम पावते.
English to Hindi Transliterate